By  
on  

दगडूशेठ हलवाई गणपती चरणी 'वाजवूया बँड बाजा'चं पोस्टर आऊट

अमोल लक्ष्मण कागणे प्रस्तुत लक्ष्मण एकनाथराव कागणे,अमोल कागणे निर्मित आणि शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित 'वाजवुया बँड बाजा' ह्या बहुचर्चित चित्रपटाची खास झलक नुकतीच पुण्याच्या जागृत देवस्थानात म्हणजेच दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी वाहिली. निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यासमवेत चित्रपटातील मुख्य कलाकार मंगेश देसाई,प्रकाश गायकवाड डी.सी.पी पुणे, चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री प्रीतम कागणे यांनी देखील या प्रसंगी उपस्थिती लावत 'वाजवूया बँड बाजा' चित्रपटाच्या प्रसिद्धीचा श्रीगणेशा केला आहे.

प्रेक्षकांना मनमुराद हसवायला भाग पडणारा 'वाजवूया बँड बाजा' येत्या २० मार्च २०२० ला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत असून राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांच्या वेगळ्या प्रयत्नालासुद्धा रसिक-मायबाप तितकंच प्रेम देतील अशी आशा आहे. 

तीन भावांच्या आयुष्यातल्या गमती-जमतींवर आधारलेली 'वाजवुया बँड बाजा'ची मजेशीर कथा संदीप नाईक यांनी लिहिली आहे  तर प्रसंगानुरूप हास्याची कारंजे उडवणारी पटकथा तसेच संवाद निशांत नाथराम धापसे यांनी लिहिली आहेत. निसर्गरम्य असा कॅनव्हास चितारला आहे छायाचित्रकार नागराज दिवाकर यांनी. शिवाय या प्रेमकथेला खरा साज चढवलाय तो 'वाजवूया बँड बाजा; या चित्रपटातील गाण्यांनी. विजय गटलेवार आणि राहुल मिश्रा यांच्या संगीत लहरींवर गायक-आदर्श शिंदे यांच्या स्वरांनी तर चारचाँदच लावलेत. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive