By  
on  

योगेश सोमण आणि गीतांजली कुलकर्णी यांनी धरली 'वेगळी वाट'

मराठी-हिंदी चित्रपट तसेच नाटक आणि मालिकांमध्ये आपल्या भूमिकांद्वारा यशस्वी ठसा उमटवणारे अभिनेते योगेश सोमण आपल्या अभिनयामुळे कायम चर्चेत राहिलेले आहेत. तर आपल्या संवेदनशील अभिनयाने गीतांजली कुलकर्णी यांनी प्रत्येक कलाकृतीत जीव ओतलेला दिसून येतो. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये योगेश सोमण आणि गीतांजली कुलकर्णी यांचे योगदान खूप मोठे असून त्यांचे आगामी चित्रपट आणि भूमिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. इमॅजिनिट प्रॉडक्शन्सने नेमकी हीच बाब हेरत 'वेगळी वाट' या चित्रपटाद्वारे या गुणी कलावंतांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. 

जयश्री शाह आणि तुषार शाह प्रस्तुत 'वेगळी वाट' हा चित्रपट ७ फेब्रुवारी २०२० ला आपल्या भेटीस येणार असून तत्पूर्वी योगेश सोमण आणि गीतांजली कुलकर्णी यांची चित्रपटातील एक झलक प्रकाशित करण्यात आली आहे. 'वेगळी वाट' या चित्रपटात योगेश सोमण प्रेमळ शिक्षकांच्या भूमिकेत आणि गीतांजली कुलकर्णी  ह्या त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसतील. शाळेतील एका विद्यार्थिनीवर आपल्या मुलीपेक्षा अधिक प्रेम करणारे तिला जगण्याची योग्य दिशा दाखवणारे असे हे सर आणि ... मॅडम तिला कोणती 'वेगळी वाट' दाखवतील हे पाहणं रंजक ठरेल. 

अच्युत नारायण लिखित-दिग्दर्शित 'वेगळी वाट' चित्रपटाचा आशय-विषय प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पडणारा आहे. 'वेगळी वाट'ची मनःस्पर्शी पटकथा वडील आणि मुलीच्या नात्यावर आधारलेली आहे. एका सुखी चौकोनी कुटुंबाचा जीवनप्रवास रेखाटणारा हा चित्रपट प्रेक्षकांना अंतर्मुख करेल यात काहीच शंका नाही. या चित्रपटाचे छायांकन शकील खान यांचे आहे तर मंसूर आजमी यांचे संकलन, सुनील सिंह यांचे पार्श्वसंगीत लाभले आहे नव्या वर्षात नव्या दमात 'वेगळी वाट' प्रेक्षकांना एक समृद्ध करणारा अनुभव देईल यात काही शंका नाही. 'वेगळी वाट' तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात  जाऊन नक्की पहा.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive