सध्या मराठी सिनेसृष्टीत एकच चर्चा रंगली ती म्हणजे अभिनेत्री नेहा पेंडसे आणि पुण्यातील व्यावसायिक शार्दुल सिंग बयास यांच्या शानदार लग्नसोहळ्याची. नेहाने शार्दुलसोबत रविवारी लग्नगाठ बांधली. 3 ते 5 जानेवारी असा हा शाही लग्नसोहळा फक्त नातेवाईक आणि जवळचे मित्रमेत्रिणी यांच्या उपस्थितीत शानदार पध्दतीने पार पडला. नेहाने लग्नात पती शार्दुलसाठी घेतलेल्या उखाणासुध्दा बराच व्हायरल होत आहे.
नेहा आणि शार्दुलचं लग्न मराठमोळ्या रीतीरिवाजांनीही पार पाडलं. नेहा आपल्या लग्नसोहळ्याचे प्रत्येक अपडेट्स इन्स्टाग्रामवरुन चाहत्यांपर्यंत पोहचवत होती आणि चाहतेसुध्दा त्या फोटोवर लाईक्स आणि अभिनंदनाचा वर्षाव करत होते. लग्नानंतर अवघ्या काही तासांतच नेहाने एक मोठा बदल केला आहे. तुम्हीसुध्दा तो बदल पाहू शकता. नेहाने सोशल मिडीया अकाउंटवरुन आपल्या नावासोबत सासरचं आडनाव लावलं आहे. 'नेहा पेंडसे बयास' असं नाव तिने इन्स्टाग्रामवर लग्नानंतर अपडेट केलं आहे. लग्नानंतर सासरचं आडनाव जोडण्याचा ट्रेण्ड आहे. सोनम कपूर, प्रियांका चोप्रा या अभिनेत्रींप्रमाणेच नेहानेसुध्दा नावापुढे सासरचं आडनाव लावलं आहे.
नेहा आणि शार्दुलने मागील वर्षी इटलीमध्ये नात्याची कबुली दिली होती. त्यानंतर हे दोघंही कधी लग्न करणार याची चर्चा होती. नेहाच्या लग्नाला मराठी सिनेसृष्टीतले तिचे जऴळचा मित्र परिवार अभिजीत खांडकेकर, श्रुती मराठे, हेमांगी कवी आणि संस्कृती बालगुडे हे कलाकार उपस्थित होते.