By  
on  

नाना म्हणतात, 'जेएनयूतील विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरकडे लक्ष द्यावं'

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा देशभरातून निषेध करण्यात आला. देशभर एकच संतापाची लाट उसळली  असून सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे.  

जेएनयूमधील हल्ल्याचे वृत्त वा-यासारखे पसरले आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात जमले आणि रात्रभर या ठिकाणी धरणे दिले. ‘ऑक्युपाय गेटवे’ या मोहिमेतून विद्यार्थ्यांचे लोंढे ‘गेटवे’कडे मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना गेट वे ऑफ इंडिया या परिसरातून हटवलं असून त्यांची रवानगी आता आझाद मैदानात करण्यात आली आहे.  या संपूर्ण प्रकारावर ज्येष्ठ अभिनेते  नाना पाटेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

नाना म्हणतात,'विद्यार्थी म्हणून आम्हीही होतो आणि तुम्हीही आहात. मुळामध्ये आपले आई-वडिल कोणत्या परिस्थितीतून जात असताना आपल्याला शिकवतात हे विद्यार्थ्यांनी विसरता कामा नये. त्यामुळे विद्यार्थ्यांनी करिअरकडे लक्ष द्यावं ,बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा ', अशी प्रतिक्रिया दिली आहे.  

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive