By  
on  

सई ताम्हणकरने फॅन्सला दिली ही भेटवस्तू

 आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला भेटण्यासाठी, त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांची चाहती मंडळी सदैव उत्सुक असतात. यासाठी ते विविध फॅन क्लब्सही सुरु करतात. सोशल मिडीयाच्या माध्यमातून किंवा साक्षात आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला भेटण्याची संधी या फॅन क्लब्सना मिळते. 


आणि अशाच फॅन क्लबची स्थापना पाच वर्षांपूर्वी करण्यात आली. हे फॅन क्लब म्हणजे सई होलिक्स. मराठी सिनेसृष्टीतली ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकरच्या चाहत्यांनी सई होलिक्स नावाचं फॅन क्लब सुरु केलं होतं. सई होलिक्स फॅन क्लबने आत्तापर्यंत सामाजिक भान जपत वेगवेगळ्या पद्धतिने सई ताम्हणकरचे वाढदिवस साजरे केले आहेत. काही वर्षांपूर्वी याच फॅन कल्बने महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये वृक्षारोपण करून सईचा बर्थडे साजरा केला होता. आणि या सई होलिक्स फॅन क्लबला नुकतीच पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. 

याच निमित्ताने सई ताम्हणकरसोबत केक कापून या चाहत्यांनी याचं सेलिब्रेशन केलं. एवढचं नाही तर सईने देखील आपल्या या चाहत्यांसाठी आणली खास भेट. सईने आपल्या फॅन्सना यावेळी रोपटी भेट म्हणून दिली आणि वृक्षसंवर्धनाचा संदेशही दिला. 


मागील पाच वर्षांपासून हे फॅन क्लब सईच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनपासून ते तिच्या विविध सिनेमांच्या प्रमोशनपर्यंत विविध गोष्टी सईसाठी करत असतात. मराठी सिनेसृष्टीतील बऱ्याच अभिनेत्रींचे विविध फॅन क्लब आहेत. मात्र सई होलिक्स त्याच्या हटके नावामुळे सगळ्यांचं लक्ष वेधते. 
 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive