By  
on  

चिराग पाटीलचा '83 द फिल्म'मधून उलगडला लुक; वडील संदीप पाटील यांची साकारतोय भूमिका

कबीर खान दिग्दर्शित 83 द फिल्म या बहुचर्चित सिनेमातून अभिनेता चिराग पाटीलचा लुक नुकताच उलगडला आहे. या सिनेमात तो आपल्या वडिलांच्याच म्हणजेच क्रिकेटर संदीप पाटील यांच्या भूमिकेत आहे. त्यामुळे सर्वांनाच या सिनेमातील त्याची भूमिका पाहण्याची उत्सुकता आहे. 

चिरागने यापुर्वी 'वजनदार', 'वेक अप इंडिया', 'असेही एकदा व्हावे' या मराठी सिनेमांत काम केलं आहे. 

 

 

 

ज्या सिनेमाची निर्मितीपासून चर्चा आहे, तो सिनेमा म्हणजे ‘83 द फिल्म ’. कबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा १९८३मध्ये वर्ल्डकप जिंकलेल्या टीमवर आधारित बायोपिक आहे.  दीपिका पादुकोण ह्यात कपिल देव यांची पत्नी रोमी देवची भूमिका साकारतेय. दीप-वीरचा लग्नानंतरचा एकत्र हा पहिलाच सिनेमा. 

‘83 द फिल्म ’ हा मल्टिस्टारर सिनेमा पुढच्या वर्षी 10 एप्रिल  2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive