माझ्याकडे सिनेमे येत नाही, खूप वर्षांनी सिनेमात काम करतेय - ऋजुता देशमुख

By  
on  

विकून टाकमधून अभिनेत्री ऋजुता देशमुख बऱ्याच वर्षांनी सिनेमांमध्ये पाहायला मिळणार आहे. नाटकं, मालिकांमध्ये दिसणारा हा प्रसिद्ध चेहरा आता विकून टाक या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. नुकत्याच झालेल्या सिनेमाच्या ट्रेलर लाँचला ऋजुताने तिच्या करियरविषयीची महत्त्वाची गोष्ट शेयर केली. ऋजुता म्हटली की, “माझ्याकडे सिनेमे येत नाही, खूप वर्षांनी मी असं कॅरेक्टर या सिनेमाच्या माध्यमातून करतेय. असं कॅरेक्टर मी कधी साकारलेलं नाही. गावातली ठराविक पद्धतिची वहिनी मी साकारतेय. या सिनेमातील गाण्याच्या निमित्ताने खूप वर्षांनी मला नाचायलाही मिळालं.”

शिवाय पिपींगमून मराठीला दिलेल्या मुलाखतीत ऋजुता म्हटली की, “मला वाटतं की मी अनेक वर्ष मालिका करतेय, त्यामुळे त्या अनुशंगाने फक्त मालिकांसाठी विचारलं गेलं असेल. समीर पाटील यांनी वेगळा विचार केला याचा मला आनंद आहे. आणि आता इतरांनीही असा विचार करावा. खासकरून आमच्या जोडीचा म्हणजेच समीर चौगुले आणि मी अशा जोडीचा विचार या दिग्दर्शकांनी केला.”


सध्या ऋजुता आनंदी हे जग सारे या मालिकेत पाहायला मिळतेय. 

 

 

 

Recommended

Loading...
Share