हा सिनेमा ठरला रशियामध्ये प्रदर्शित होणारा पहिला मराठी सिनेमा

By  
on  

जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी सिनेमा पोहोचतोय आणि त्याचं ताज उदाहरण म्हणजे काळ हा मराठी सिनेमा. कारण काळ या सिनेमाला रशियामध्ये प्रदर्शित होणारा पहिला मराठी सिनेमाचा मान मिळाला आहे.

हा सिनेमा महाराष्ट्रात येत्या 24 जानेवारीला रिलीज होत आहे. त्यानंतर हा सिनेमा रशियातील 30 शहरांमध्ये 100 सिनेमागृहात प्रदर्शित केला जाणार आहे. 


सिनेमाची कथा ही पॅरानॉर्मल गोष्टीवर आधारित आहे. या सिनेमाचे लेखन, दिग्दर्शन आणि संकलन डी संदीप यांनी केले आहे. सतीश गेजगे, संकेत विश्वासराव, श्रेयस बेहेरे, राजकुमार जरांगे, वैभवी चव्हाण आणि गायत्री चिघलीकर यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. 
 
 
 
‘ 

Recommended

Loading...
Share