मराठी बिग बॉस फेम सई लोकूरच्या घरी नवा पाहुणा

By  
on  

मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वातील स्पर्धक अजूनही काहीना काही कारणांसाठी चर्चेत असतात. आत्तापर्यंत मराठी बिग बॉसचे दोन सिझन पार पडले. मात्र प्रेक्षक अजूनही पहिल्या पर्वातील स्पर्धकांना विसरलेले नाहीत. या स्पर्धकांपैकी एक म्हणजे सई लोकूर. सई लोकूरला सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात फॉलो केलं जातय. बिग बॉस मराठीनंतर तर तिच्या चाहत्यांमध्ये आणखी वाढ झाली. आणि म्हणूनच सईने काही पोस्ट केली तर त्याची चर्चा होते. सई लोकूरने नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोंची चर्चा होत आहे. या फोटोत आहे सईच्या घरी नुकतात आलेला नवा पाहुणा.


हा पाहुणा दुसरा तिसरा कुणी नसून हा आहे एक डॉग पेट. या गोंडस पेटचं सईने 'मोका' असं नाव ठेवलय. सईने हे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करताच तिच्या बिग बॉस मराठीमधील मित्र मैत्रिणींनी या फोटोंवर कमेंट्सही केल्या आहेत. 

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडेने या फोटोवर कमेंट करत गंमतीत म्हटलयं की, “आता याला सारखं भेटण्याची संधी(मोका) शोधावी लागेल मला”.

तर बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाची स्पर्धक नेहा शितोळेनेही या फोटोंवर कमेंट केली आहे. नेहा म्हणते की, “ हे देवा , आता आपल्याला लवकरच भेटावं लागेल”. 


एकूणच सईच्या घरी आलेल्या या नव्या गोंडस पाहुण्याला भेटण्यासाठी तिच्या या मराठी बिग बॉसच्या मंडळी चांगल्याच उत्सुक असल्याचं पाहायला मिळतय. 
 

Recommended

Loading...
Share