नुकतच पिंपरी-चिंचवड येथे आयोजीत एका कार्यक्रमात अभिनेता नाना पाटेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. कलारंग सांस्कृतिक कला संस्थेच्या कार्यक्रमात मंचावर त्यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी बऱ्याच विविध मुद्द्यांवर नाना बोलताना दिसले. यावेळी एक मोठा खुलासा नाना पाटेकर यांनी केला.
नाना पाटेकर यांनी सिनेमात साकारलेल्या गुन्हेगारी भूमिकांची एक चित्रफीत या कार्यक्रमात दाखवण्यात आली. यावेळी या मुद्द्यावर बोलत असताना नाना म्हणाले की, “गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, माझ्या आईच्या बाजुने आमची मामा वैगेर मंडळी होती. त्यांच्यापासून लांब म्हणून आई आम्हाला लांब घेऊन गेली मुरुडला.”
प्रत्यक्षात मोठ्या गुन्हेगाराला भेटले आहात का? या प्रश्नावर नाना यांनी असे उत्तर दिले, नाना म्हटले की “मन्या सुर्वे माहित आहे का? तर तो माझा भाऊ आहे. तो माझ्या मामाचा मुलगा. मला असं वाटतं की ते आम्ही होऊ नये म्हणून आई आम्हाला गावाला घेऊन गेली. पण कुठेतरी तुमच्यात ते असतच. व्हॉयलन्स हा कधी ओरडत नाही. गुंड हे शांत असतात. अशिक्षित माणूस गुंड झाला तर परवडतो, सुशिक्षित माणून गुंड झाला की गोंधळ होतो.”
गँगस्टर मन्या सुर्वे हा त्यांचा भाऊ असल्याचं बोलल्यानंतर नानांच्या या वक्तव्याची आता सगळीकडेच चर्चा होत आहे.