By  
on  

स्टायलिश अभिनेत्री ‘मीरा जोशी’ आता दिसणार युनिफॉर्ममध्ये

अभिनेत्री आणि नृत्यांगना मीरा जोशी आता आणखी एका वेगळ्या भूमिकेतून समोर येणार आहे.

मीराने या आधी ‘तुझ-माझं ब्रेक अप’ या मालिकेतून नकारात्मक भूमिका साकारली होती. मीरा आता पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘फक्त मराठी’ वाहिनीवरील ‘स्पेशल पोलिस फोर्स’ या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.

 

 

मीरासोबतच अभिनेता संजय बोरकरही दिसणार आहे. मीराने यापुर्वी ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमासाठी असिस्टंट कोरिओग्राफर म्हणूनही काम पाहिलं आहे. याशिवाय ‘तुझ विन मर जावा’ या सिनेमातूनही ती दिसली होती.

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive