सोशल मिडीया आता प्रत्येक व्यक्तिच्या आयुष्याचा महत्त्वाचा घटक झाला आहे. त्यातच या सोशल मिडीयाने कित्येकांच्या आयुष्यात खुप मोठा बदल घडवुन आणला आहे. काहींची मैत्री सोशल मिडीयावर होत असते तर काहींचे प्रेम जुळते. अशीच एक जोडी आहे ज्यांची मैत्री सोशल मिडीयावर झाली. ही जोडी म्हणजे अभिनेता सिध्दार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर. इन्स्टाग्रामवर झालेली मैत्री हळुहळु फुलत गेली आणि त्याला प्रेमाचं स्वरुप मिळालं.
मागील वर्षी 24 जानेवारी रोजी दोघांचा साखरपुडा पार पडला होता. आणि त्यांच्या आयुष्याती याच सुंदर क्षणाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहेत. सोशल मिडीयावर दोघांनी पुन्हा एकदा या सुंदर आठवणींना उजाळा दिला आहे.
सिध्दार्थ आणि मितालीचा हा साखरपुडा सोहळा मागील वर्षी चर्चेचा विषय ठरला ते त्यांच्या या साखरपुड्यातील फोटोजमुळे, व्हिडीओजमुळे आणि आउटफिट्समुळे. दोघांच्या आउटफीट्सने सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं.
यावेळी हिरव्या रंगाचे कॉम्बिनेशन आणि मरुन-क्रिम कलर कॉम्बिनेशनचे दोघांचे आउटफिट अतिशय सुंदर दिसले होते.
या दिवसाला आणखी स्पेशल करण्यासाठी सिध्दार्थने चक्क मितालीसाठी खास गाणं गायलं यावेळी मिताली भावुकही झाली होती.
सोशल मिडीयावर दोघांच्या विविध फोटोंची चर्चा असते. कपल गोल्स देणारे त्यांचे फोटो व्हायरल असतात. दोघे लग्नबंधनात कधी अडकतील याची मात्र उत्सुकता त्यांच्या चाहत्यांनाही आहे.