‘आर्ची’साठी नेहा कक्कर गायली मराठीत, ‘मिले हो तुम हमको’ गाणं मराठीत

By  
on  

बॉलिवुडमधील आणि सिंगींग रिएलिटी शोमधील प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने नुकतच मराठी सिनेमात गाणं गायलय. नेहा कक्करचं 'मिले हो तुम हमको' हे गाणं हिंदीत प्रचंड गाजलं. आणि हेच गाणं आता नेहा कक्करने मराठीत गायलं आहे. निमित्त आहे मेकअप या मराठी सिनेमाचं. ‘सैराट’ची आर्ची म्हणजेच रिंकू राजगूरु ‘मेकअप’ या तिच्या आगामी सिनेमातून पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. आणि आता याच आर्चीसाठी नेहा कक्करने पहिल्यांदाच मराठी गाणं गायलं आहे. 

नुकतच नेहाने तिच्या सोशल मिडीया अकाउंटवरुन याविषयी माहिती देत या गाण्याची झलक शेयर केली आहे. या गाण्याविषयी सांगताना नेहा म्हणते की, “मिले हो तुम हमको हे गाणं माझ्या हृदयाच्या फार जवळ आहे कारण हे गाणं माझा भाऊ टोनी कक्करने बनवलं आहे. माझ्यासाठी  माझे आई-वडिल, बहिण आणि माझा भाऊ या जगात सगळ्यात खास आहेत.आणि हेच गाणं मेकअप सिनेमात मराठी भाषेत येत असल्यानं मी खुप जास्त उत्सुक आहे.”

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

हिंदीतल्या या हीट गाण्याचं मराठी वर्जनही नेहानेच गायलंय. यागाण्याविषयी सांगताना नेहा म्हणते की, “माझी भाषा हिंदी किंवा पंजाबी आहे, मात्र मराठी माझ्यासाठी खुप कठीण होतं. मात्र उच्चार योग्य पद्धतिने करण्यासाठी गीतकार मंगेश यांनी मला यासाठी बरीच मदत केली. सिनेमाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांचेही यासाठी खुप धन्यवाद. मी आत्तापर्यंत जो एकमेव मराठी सिनेमा पाहिलाय तो म्हणजे रिंकू राजगुरुचा सैराट हा सिनेमा. आणि रिंकूसाठी माझा आवाज लाभल्यानं मी खुप उत्सुक आहे. रिंकू खुप टॅलेंटेड आहे. रिंकूला आणि पूर्म टीमला माझ्या शुभेच्छा.”

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Makeup. @chinmayudgirkar .#poster2.

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

‘मेकअप’ हा सिनेमा येत्या 7 फेब्रुवारीला रिलीज होत आहे.
 

Recommended

Loading...
Share