By  
on  

सुहृद वार्डेकर आणि सायली संजीव यांचा 'दाह' 'व्हॅलेंटाईन डेे'ला येतोय रसिकांच्या भेटीला

यंदाचा व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी एक मराठी सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. 'गोव्याच्या किनाऱ्यावर' फेम सुहृद वार्डेकर आणि मराठी सिनेमा व  मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकणारी सायली संजीव यांचा चित्रपट 'दाह मर्मस्पर्शी कथा' येत्या 'व्हॅलेंटाईन डेे'ला म्हणजेच १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. सुहृद आणि सायली यांनी मराठी मनोरंजन सृष्टीत अनेक भूमिका साकारून प्रेक्षकांकडून पसंतची पावती मिळवली आहे. आणि दोघेही पुन्हा एकदा नव्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

'दाह मर्मस्पर्शी कथा' या चित्रपटातून नात्यांच्या अनेक बाजू आणि नात्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. आपली किंवा परकी असा भेदभाव न करता प्रत्येक नात्यात मायेची, प्रेमाची भावना असते हे यामध्ये दाखवण्यात आले आहे.

युगंधर क्रिएशन्स प्रस्तुत आणि अनिकेत राजकुमार बडोले निर्मित ‘दाह’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मल्हार गणेश यांनी केली आहे तर डॉ. सतिश (अतुल) सोनोने यांनी कथा लिहिली आहे. सायली संजीव आणि सुहृद यांच्यासह गिरीश ओक, राधिका विद्यासागर, यतिन कार्येकर, उमा सरदेशमुख, किशोर चौघुले यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत.

चित्रपटातील गाण्यांना संगीतकार प्रफुल्ल स्वप्निल यांनी  संगीत दिले आहे गीतकार मंदार चोळकर आणि तेजस रानडे यांनी गाण्यांचे बोल लिहिले आहेत. संगीतकार आणि गीतकार यांनी तयार केलेल्या गाण्यांना स्वप्नील बांदोडकर, मनिष राजगिरे, अनिरुध्द वानकर, बेला शेंडे आणि मधुश्री यांनी आवाज दिला आहे. पटकथा उन्मन बाणकर आणि कौस्तुभ सावरकर यांनी लिहिली आहे तर संवाद कौस्तुभ सावरकर यांचे आहेत. उमेश शिंदे हे कार्यकारी निर्माते आहे.

'दाह मर्मस्पर्शी कथा' १४ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive