By  
on  

बॉक्स ऑफीस क्लॅश टाळण्यासाठी आता 'व्हॅलेंटाईन डे'ला प्रदर्शित होणार 'विकून टाक'

अनेकदा बॉक्स ऑफीसवरचे क्लॅश टाळण्यासाठी आणि रसिकांची वाहवा मिळवण्यासाठी अनेक फिल्ममेकर्स आपल्या सिनेमाच्या तारखा बदलण्याचा निर्णय घेतात. 'विकून टाक' हा नवा कॉमेडी सिनेमा येत्या शुक्रवारी रसिकांच्या भेटीला येणार होता. बॉलिवूड विनोदवीर चंकी पांडेच्या मराठीतील हा पदार्पणाचा सिनेमा. पण याच शुक्रवारी म्हणजे येत्या 31 जानेवारी रोजी मल्टीस्टारर मॅड कॉमेडी 'चोरीचा मामला' सिनेमा प्रदर्शित होत आहे. त्यामुळे  'विकून टाक'च्या मेकर्सनी ह्या सिनेमाची रिलीज डेट बदलण्याचं सुरक्षित पाऊल उचलंल. आता हा सिनेमा येत्या 14 फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डेला सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहेत. 

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये हा ट्रेण्ड अगदी सामान्य आहे. आता मराठी मध्ये देखील हा ट्रेण्ड रुजताना दिसत आहे.या निर्णयाबद्दल बोलताना 'विकून टाक'चे निर्माते उत्तुंग ठाकूर म्हणाले, " 'विकून टाक' सिनेमातून आम्ही प्रेक्षकांना हसवता हसवता सामाजिक संदेशही देणार आहोत. चित्रपट बनवताना संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेऊन त्यांच्या कल्पनेतला सिनेमा प्रत्यक्षात साकारण्यासाठी प्रयत्न करत असते.  एकाच दिवशी मोठे सिनेमे प्रदर्शित झाल्यास त्या चित्रपटांच्या व्यवसायाला त्याचा फटका बसतो. अशावेळी प्रेक्षकांनाही प्रश्न पडतो, की कोणता चित्रपट पाहावा? त्यामुळे आमचा हा निर्णय सगळ्यांसाठीच योग्य आहे.  मला वाटते प्रेक्षकही उत्सुकतेने या सिनेमांच्या प्रतीक्षेत आहेत. चित्रपटसृष्टी ही एका परिवारासारखी आहे. आमच्या या निर्णयामुळे सर्व चित्रपटांच्या निर्मात्यांना आणि पर्यायाने चित्रपटसृष्टीला त्याचा फायदा होईल." 

समीर पाटील दिग्दर्शित    'विकून टाक' या चित्रपटात शिवराज वायचळ, चंकी पांडे, रोहित माने, राधा सागर, ऋतुजा देशमुख, समीर चौगुले, हृषीकेश जोशी, वर्षा दांदळे, जयवंत वाडकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive