सध्या लग्नसराईचा मौसम आहे. सर्वत्र लग्नसोहळ्याची धामधूम पाहायला मिळतेय. आपल्या सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनीसुध्दा यंदा लग्नगाठ बांधली. आता यात आणखी एक नाव जोडलं गेलं आहे, ते म्हणजे 'जुळून येती गाठी' फेम अभिनेत्री सायली देवधर. या मालिकेत सायलीची भूमिका लक्षवेधी ठरली होती. 'लेक माझी लाडकी' या मालिकेतसुध्दा तिने नायिका रंगवून सर्वांचीच मनं जिंकली. सायली नुकतीच संगीतकार आणि पार्श्वगायक गौरव बोरुसे यांच्यासह विवाहबंधनात अडकली.
गेल्यावर्षी सायली आणि गौरवने मोठ्या थाटात साखरपुडा केला होता. यंदा ही जोडी धूमधडाक्यात लग्नबंधनात अडकली. सायली सोशल मिडीयावर बरीच सक्रीय असते. आपल्या लग्नाचे फोटोसुध्दा तिने शेअर केले आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळीसुध्दा सायलीच्या लग्नाला आवर्जुन उपस्थित होती. सायली आणि प्राजक्ता .या सहकलाकार असण्यासोबतच एकाच ग्रुपमधल्या घट्ट मैत्रिणी आहेत.
मैत्रिणीच्या लग्नातला ग्रुप फोटो पोस्ट करत प्राजक्ता मजेशीर म्हणतेय, "Bachelor group मधला आणखी एक बुरूज़ ढासळला..."