पाहा Teaser: कर्तव्य आणि प्रेमाच्या कात्रीत सापडलेला ‘अजिंक्य’

By  
on  

अजिंक्य म्हणजे ज्याला सहज हरवणं शक्य नाही असा. सतता जिंकणा-या अजिंक्यची गोष्ट आगामी अजिंक्य या सिनेमात दिसत आहे. या सिनेमात स्वप्नांच्या पाठी धावणारा अजिंक्य आणि जमीनीशी नाळ जोडलेली असलेली रितीका यांच्या प्रेमाची गोष्ट अजिंक्यमध्ये दिसेल. या सिनेमात प्रार्थना बेहरे आणि भुषण प्रधान मुख्य भूमिकेत आहेत. 

 

 

भुषण अजिंक्यच्या व्यक्तिरेखेत आहे तर रितीकाच्या व्यक्तिरेखेत प्रार्थना बेहरे आहे. अजिंक्य हा एक महत्वाकांक्षी तरुण आहे. अजिंक्यला करीअरमध्ये खुप मोठ्या उंचीवर जाण्याची इच्छा आहे. तर एकीकडे रितीका आहे जी अजिंक्यवर निरातीशय प्रेम करत असते. अजिंक्य महत्वकांक्षी असलातरी यशासाठी वाटेल तो मार्ग स्विकारणारा अजिबात नाही.

 

सिनेमाच्या टीजरमध्येही हेच दिसून येतं. एका प्रोजेक्टवर काम सुरु करण्याआधी अजिंक्य तिथल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. पण यात तो यशस्वी होतो का ते लवकरच कळेल. या सिनेमाचं दिग्दर्शन अ. कादिर यांनी केलं आहे. ल्युमिनरी सिने वर्ल्ड निर्मित आणि एक्झॉटेक मीडिया प्रा. लि. यांची प्रस्तुती असलेला ''अजिंक्य'' सिनेमा येत्या २० मार्च २०२० रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Recommended

Loading...
Share