रोहित शेट्टी अमृता खानविलकरला म्हणाला....'ओ काकी', तुम्ही पाहिलात का Video?

By  
on  

मराठीतील हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री अमृता खानविलकरचा भाव सद्या भलताच वधारलाय. 'चोरीचा मामला'मधून रसिकांचं मन जिंकणारी आणि बॉलिवूडच्या 'मलंग'मधून लक्षवेधी भूमिका साकारणारी अमृता आता लवकरच 'खतरों के खिलाडी' या हिंदी  रिएलिटी शोमधून रसिकांच्या भेटीला येणार आहे. ती फिटनेस फ्रीक म्हणून ओळखली जाते तसंच  स्टायलिश राहण्यालासुध्दा पसंती देते. पण अमृताला कोणी काकी म्हटल्याचं तुम्हाला माहितीय का, आश्चर्य वाटलं ना...अमृताला कोणी काकी कसं म्हणू  शकेल. 

तर त्याचं झालं असं, की अमृता  एका पिवळ्या रंगाच्या जगप्रसिध्द लॅम्बॉर्गिनी गाडीजवळ उभी होती, आणि आपल्याला ही गाडी हा रंग किती आवडतो असं म्हणत होती. तितक्यात काय झालं पटकन रोहित शेट्टीची त्या गाडीजवळ एन्ट्री झाली आणि त्यांनी अक्षरश: हाकलून दिल्यासारखं करत, तो अमृताला म्हणाला  "ओ काकी...झालं का तुमचं चला, बाजूला व्हा" व त्याच लॅम्बॉर्गिनी गाडीत बसून निघून गेला. हा भन्नाट व्हिडीओ खुद्द अमृतानेच शेअर केला आहे. 

आपल्या सिनेमांमध्ये हवेत उडणा-या गाड्या आणि गाड्यांचे नानाविविध स्टंट दाखविण्यात माहिर असणारा सर्वांचा लाडका दिग्दर्शक रोहित शेट्टीला प्रत्यक्ष आयुष्यातसुध्दा गाड्यांचा छंद आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने  ही पिवळ्या रंगाची Lamborghini Urus नवी लक्झरी कार विकत घेतली. भारतातील काही मोजक्याच श्रीमंत लोकांकडे ही कार आहे आणि आता त्यात रोहित दिमाखात सामिल झाला आहे. 

रोहित शेट्टीचं सूत्रसंचलन असलेल्या 'खतरों के खिलाडी'मध्ये आपली मराठमोळी अभिनेत्री स्पर्धक म्हणून सहभागी होतेय, त्यामुळे सर्वांनाच या शोची उत्सुकता लागलीय. 

Recommended

Loading...
Share