By  
on  

हा क्रिकेटर झळकणार मराठी सिनेमात तुम्ही ओळखलं का याला?

क्रिकेटच्या जगापासून दूर असलेला अभिनेता श्रीसंत आता मराठी पडद्यावर पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. ‘ मुंबईचा वडापाव’ या सिनेमात तो दिसणार आहे. पीके अशोकन आणि पोईलंगल ईस्माईल या सिनेमाची निर्मिती करत आहेत. हे दोघेही मल्याळम सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. 
या सिनेमात मल्याळम आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आहेत.

 

 

या सिनेमात श्रीसंतचा हटके रोल असल्याचं बोललं जात आहे. यापुर्वी श्रीसंत झलक दिखला जा, बिग बॉस, फिअर फॅक्टर या रिअ‍ॅलिटी शो मध्ये दिसला होता. त्यावेळी चाहत्यांनी त्याच्या अपिअरन्सचं कौतुक केलं होतं. आयपीएल फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळल्याने श्रीसंतवर बंदीची कारवाई केली गेली होती.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive