By  
on  

हल्ला होऊनही दिग्दर्शकाने केली नाही पोलिसात तक्रार, जाणून घ्या काय आहे कारण 

बायको देता का बायको!’ या मराठी सिनेमामुळे नवा वाद समोर आला आहे.  बीड मधील आशा सिनेफ्लेक्स सिनेमागृहात या सिनेमाचा शो सुरु होता. यावेळी शो सुरु झाल्यानंतर प्रेक्षकांना भेटण्यासाठी सिनेमाचे कलाकार आणि दिग्दर्शक आले होते. यावेळी अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला केला होता. यात अभिनेता सुरेश ठाणगे आणि दिग्दर्शक गंभीर जखमी झाले होते. आणि याच हल्ल्यासंदर्भात आणि सिनेमाविषयी झालेला गैरसमज दुर करण्यासाठी नुकतीच या सिनेमाच्या टीमने एक पत्रकार परिषद घेतील होती. यावेळी सिनेमाचे दिग्दर्शक सुरेश ठाणगे यांनी सिनेमाविषयी गैरसमज पसरवला जात असल्याचे सांगत घडलेल्या प्रकाराबाबत खेद व्यक्त केला आहे. 


यावेळी सुरेश ठाणगे म्हटले की, “ हा सिनेमा सगळ्यांपर्यंत पोहचावा अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. या सिनेमातून कोणाचीही बदनामी करण्याचा हेतू नाही. आम्हाला झालेली मारहाण पूर्वग्रह मनात ठेवून झाली असल्याचं आम्हाला समजले आहे. ज्यांच्यामुळे हा प्रकार आमच्यावर ओढवला त्या मुलांच्या पालकांनी आम्हाला तक्रार न करण्याची विनंती केली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आम्ही हा सिनेमा केला त्याच मुलांचे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही या हल्ल्याची पोलिसात तक्रार दाखल केली नाही.”


सिनेमाविषयी गैरसमज न पसरवता चित्रपटाचेही नुकसान होऊ नये यासाठी हा सिनेमा पाहण्याचे आवाहन या सिनेमाच्या निर्माते-दिग्दर्शकांनी केलय. शिवाय सिनेमातून नेमकं काय सांगायचे आहे हे जाणून घेण्यासाठी सिनेमा पाहावा अशी विनंदी दिग्दर्शक सुरेश ठाणगे आणि निर्माते धनाजी यमपुरे यांनी या पत्रकार परिषदेत केली आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive