अलोक राजवाडे दिग्दर्शित ‘अश्लील उद्योग मित्रमंडळ’ हा सिनेमा प्रदर्शनापूर्वीच मोठ्या वादाच्या भोव-यात सापडला आहे. आधी सविता भाभी या नावाच्या कॉपीराईटवरुन वादंग उठल्यानंतर आता या सिनेमाच्या नावालाच ब्राम्हण महासंघाने आक्षेप घेतल्याचे समजतेय. या सिनेमाचं नाव बदलावं अशी मागणी महासंघाकडून जोर धरतेय.
अश्लिल शब्द हा विकृतीला प्रोत्साहन देणारा असून त्यामुळे लैगिक भूकसुध्दा चाळवली जाते, त्यामुळे सिनेमाचं नाव बदलण्यात यावं अशी मागणी महासंगाकडून करण्यात येतेय.
महासंघाकडून निर्मात्यांना फोन करुन चित्रपटाचं नाव बदल्याची मागणी केलीय. मात्र प्रदर्शनाची तारीख जवळ आल्यामुळे नावात बदल करणं शक्य नसल्याचं निर्मात्यांनी सांगितलं. मात्र आम्ही आमचा विरोध कायम ठेवणार आहोत, असंही संघाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
अभिनेता आलोक राजवाडे हा ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’चं दिग्दर्शन करत आहे. हा त्याच्या दिग्दर्शनाच्या पदार्पणाचा सिनेमा आहे. सिनेमात सई ताम्हणकरसोबत पर्ण पेठे, अभय महाजन, सायली पाठक, अक्षय टांकसाळे, ऋतूराज शिंदे, केतन विसाळ, विराट मडके आणि अमेय वाघ यांनी सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत.
येत्या 6 मार्च रोजी ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ प्रदर्शित होत आहे.