शतकातले महानायक अमिताभ बच्चन यांचा पहिला वहिला मराठी सिनेमा म्हणून 'एबी आणि सीडी' या सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढलीय. विक्रम गोखले आणि अमिताब बच्चन या दोघांभोवती या सिनेमाची कथा फिरते. नुकताच एबी आणि सीडी या बहुप्रतिक्षित सिनेमाचा ट्रेलर रसिकांच्या भेटीला आला आहे. ह्या ट्रेलर लॉंच सोहळ्याला अमृता खानविलकर, प्रसाद ओक, आणि श्रेयस तळपदे या सेलिब्रिटींची खास उपस्थिती होती. त्यांच्यासोबतच सिनेमातील सर्व कलाकार व तंत्रज्ञ टीम हजर होती.
ही कथा आहे, चंद्रकांत देशपांडेंची. वार्धक्याकडे झुकलेल्या चंद्रकांत देशपांडेंना सतत कौंटुंबिक मानहानीला आणि तुसडेपणाला सामोरं जावं लागतं. त्यामुळे आयुष्याच्या संध्याकाळी चंद्रकांत गोखले व त्यांच्या पत्नी नैराश्याच्या गर्तेत अडकले आहेत. चंद्रकांतजी हे उत्तम चित्रकारही आहेत. सतत अपमानास्पद वागणूक मिळणा-या चंद्रकांतजींना एकदा अचानकच त्यांच्या जुन्या वर्गमित्राचं पत्रं येतं आणि त्यांच्या संपूर्ण आयुष्यालाच कलाटणी मिळते. कारण त्यांना पत्रं आलं असतं, ते महानायक अमिताभ बच्चन यांचं..आणि हीच गंमत आपल्याला सिनेमात पाहायला मिळणार आहे.
पाहा ट्रेलर
मिलिंद लेले दिग्दर्शित 'एबी आणि सीडी' या सिनेमात सुबोध भावे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, शर्वरी लोहोकरे, नीना कुळकर्णी, लोकेश गुप्ते, सीमा देशमुख, सागर तळाशीकर यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. येत्या 13 मार्चला हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येतोय, अक्षय विलास बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, गोल्डन रेशो फिल्म्सने या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळलीय.
‘एबी’ म्हणजे अमिताभ बच्चन आणि ‘सीडी’ म्हणजे चंद्रकांत देशपांडे. दोन कलाकारांची ऑन स्क्रिन मैत्री पाहण्यासाठी आत्ता सर्वच उत्सुक झाले आहेत.