By  
on  

Video : मुंबईची भाषा हिंदी म्हणणा-या चंपक चाचा फेम अमित भट्ट यांनी मागितली मनसे कार्यकर्त्यांची माफी

'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतील मराठी भाषेचा अपमान प्रकरणाचा वाद सध्या चांगलाच उफाळला आहे. मालिकेतील या भागात जेठालालचे वडील म्हणेजच बापुजी मुंबईची भाषा हिंदी असल्याचं सोसायटीतील इतर सदस्यांना सांगताना पाहायला मिळतायत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावर अक्षेप घेतला असून सब टीव्हीनं याबद्दल माफी मागावी अशी मागणी केली होती, आता  मालिकेत मुंबईची भाषा हिंदी म्हणणा-या चंपक चाचांनी म्हणजेच अभिनेते अमित भट्ट यांनी मागितली मनसे कार्यकर्त्यांची माफी मागितली आहे. 

" मालिकेची संपूर्ण टीम ही प्रचंड प्रेशरखाली शूटींग करत असते. एका एपिसोडसाठीचं शूटींग एका दिवसात संपविण्याची खुप मोठी जबाबदारी आणि प्रेशर आमच्यावर असतं. नेहमी सीनपूर्वी आम्ही सर्व एकत्रित बसून वाचन करतो. सराव करतो. चर्चाविनिमय असतो. पण हा सीन फार घाईतच शूट करण्यात आला. सराव सेशनही झालं नव्हतं. आम्ही आमची चुक कबूल करतो आणि पुन्हा असं घडणार नाही याची खात्री देतो, " असं अभिनेते अमित भट्ट यांनी माफीचं निवेदन देत म्हटलं आहे. 

 

"मुंबईची भाषा मराठी आहे हे माहिती असतानाही मालिकांमधून पद्धतीशीर अपप्रचार सुरु असतो. या गुजराती किड्यांची वळवळ थांबवावीच लागेल. यात काम करणाऱ्या मराठी कलाकारांनाही याची शरम वाटत नाही याचीच शरम वाटते" असं अमेय खोपकर ट्विटरवरुन म्हटलं होतं.

.

हा होता एपिसोडमधलं सीन

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive