By  
on  

Maharashtra Budget 2020 : नाट्यसंमेलनासाठी सरकारने केली ही मोठी तरतूद

नाट्यप्रेमींसाठी यंदाच्या अर्थसंकल्पाकडून एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना नाट्यसंमेलनाच्या निधीत वाढ करण्यात आल्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं.  आता नाट्यसंमेलनासाठी १० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येईल. 

महाविकास आघाडी सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प मांडला. निधीत वाढ करण्यासोबतच  मुंबईत मराठी भवन बांधणार असून  वडाळ्यात मुंबईत वस्तू आणि सेवा कर केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी १४८ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. 

तसंच पुणे जागतिक चित्रपट महोत्सवासाठी ४ कोटी आणि सारथी संस्थेची स्वायत्तता अबाधित ठेवून ५० कोटींची तरतूद आल्याचंही त्यांनी या अर्थसंकल्पात स्पष्ट केलं. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive