पाहा Photos : असा रंगला 'नेबर्स'चा ट्रेलर लॉंच सोहळा

By  
on  

विज्ञान-तंत्रज्ञानाची कल्पनारम्य कथा असलेला 'नेबर्स' हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात चेतन चिटणीस, कृत्तिका गायकवाड, सिद्धार्थ बोडके, प्रसाद जावडे, शैलेश दातार, नेहा बंब, अदिती येवले आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. एका तरुणीची गूढ कथा या चित्रपटाच्या निमित्ताने पाहायला मिळणार आाहे. या सिनेमाचा  ट्रेलर आणि म्युझिक लॉंच सोहळा शानदार पध्दतीने नुकताच पार पडला. 

दिग्दर्शक विनय घोलप यांचीच पटकथा असलेल्या या चित्रपटाचे संवाद हृषीकेश कोळी आणि विनय घोलप यांनी लिहिले आहेत तर छायालेखनाची  महत्वाची जबाबदारी आशुतोष आपटे यांनी सांभाळली आहे.

 

गीतकार मंगेश कांगणे यांच्या गीतांना संगीतकार निषाद यांनी स्वरसाज चढविला आहे. पार्श्वसंगीतही त्यांनीच दिले आहे. गायक नकाश अजीज ,अरमान मलिक ,अवधूत गुप्ते ,रितिका निषाद ,देवश्री मनोहर ,कृष्णा बोंगाणे आहे.

 

मिठुवाला प्रौडक्शन्स' आणि  “कल्पना रोलिंग  पिक्चर्स प्रौडक्शन' निर्मित  'नेबर्स'  हा चित्रपट येत्या २० मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

Recommended

Loading...
Share