सैराट मधील ही भूमिका साकारणा-या अभिनेत्याने निवडला वेगळा मार्ग

By  
on  

सैराटमधून आर्ची आणि परशा म्हणजे रिंकू आणि आकाशला प्रसिद्धी मिळालीच याशिवाय या सिनेमात त्यांच्या मित्रांच्या व्यक्तिरेखेत असलेल्या कलाकारांनाही प्रसिद्धी मिळाली. त्यापैकीच एक म्हणजे प्रदीप. सिनेमात लंगड्याच्या नावाने प्रसिद्ध असलेला तानाजी गालगुंडे. अभिनयाशी कसलीही ओळख नसलेला प्रदीप सैराटमुळे प्रकाश झोतात आला.

पण आता लाईमलाईट पासून लांब जाऊन प्रदीप एका वेगळ्या क्षेत्रात नशीब आजमावत आहे. प्रदीप सध्या गावी शेती करत आहे. आजही त्याचे फॅन्स सोलापुर येथील गावी त्याला भेटायला येतात. प्रदीप सध्या पदवीचा अभ्यासक्रम पुर्ण करत आहे. तो सैराटनंतर एका जाहिरातीमध्ये दिसला होता. पण त्यानंतर त्याने शेतीचा मार्ग स्विकारला आहे.

Recommended

Loading...
Share