By  
on  

अभिनेता चिराग पाटीलने लाडक्या लेकीसोबत असा साजरा केला वाढदिवस

अभिनेता चिराग पाटीलचा नुकताच रंगपंचमीच्या दिवशी म्हणजे 10 मार्च रोजी वाढदिवस होता. त्याचा हा वाढदिवस खुपच खास झाला.  लाडकी आणि गोड लेक रियानासोबत त्याने तो केक कापून साजरा केला. धुळवडीनिमित्त सर्वजण जल्लोष साजरा करण्यात बिझी असले तरी चाहत्यांनी चिरागवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

माजी क्रिकेटर संदीप पाटील यांचा मुलगा चिराग पाटील आता आपली स्वतंत्र ओळख सिनेसृष्टीत निर्माण करु पाहतोय. 83 द फिल्म या बहुचर्चित आगामी बॉलिवूड सिनेमात आपल्या वडिलांचीच  भूमिका साकारणा-या चिरागकडे सध्या सर्वांचं लक्ष असतानाच त्याने या सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच आपल्या नवीन मराठी सिनेमाची घोषणासुध्दा केली आहे. चिरागने सोशल मिडीयावरुन आपल्या नव्या सिनेमाची माहिती चाहत्यांसोबत सोशल मिडीयावरुन शेअर केली. या सिनेमात चिरागसोबत नायिका म्हणून गोव्याच्या किना-यावर फेम अभिनेत्री सिध्दी पाटणे झळकते आहे. 

चिराग वडील संदीप पाटील यांची भूमिका साकरत असलेल्या  ‘83 द फिल्म’ हा बहुप्रतिक्षीत सिनेमा येत्या 10 एप्रिल 2020 रोजी प्रदर्शित होत आहे. या सिनेमात कपिल देवची प्रमुख भूमिका बॉलिवूडचा एनर्जी मॅन रणवीर सिंह साकारतोय.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive