By  
on  

निर्भया प्रकरण : रितेश म्हणतो, ' आता राक्षसी वृत्ती असलेल्यांना गुन्हा करण्याचा विचारही येणार नाही'

निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व दोषींना आज पहाटे तिहार तुरुंगात फसावर लटकवण्यात आले. याचे पडसाद आता देशभर उमटू लागले आहेत. अखेर निर्भयाला न्याय मिळाला अशा प्रतिक्रीया येऊ लागल्या असतानाच, नेहमीच प्रत्येक सामाजिक विषयावर आपलं मत मांडणारा अभिनेता रितेश देशमुखनेही दोषींना फाशी झाल्यानंतर आपल्या न्यायव्यवस्थेचं कौतुक केलं आहे. 

रितेश ट्विटमध्ये म्हणतो, “अशाप्रकारचा भयंकर गुन्हा करणाऱ्याचा विचारही राक्षसी वृत्ती असलेल्यांना शिवू नये अशी भिती निर्माण करायची असल्यास कायदे कठोर करणं गरजेचं आहे. कठोर शिक्षा, जलद गतीने होणारा न्यायनिवाडा हेच असे गुन्हे थांबवण्याचा योग्य मार्ग आहे,”

 #JusticeForNirbhaya हा हॅशटॅग वापरत निर्भयाला न्याय मिळाल्याबद्दल भावना दुस-या आणखी एक ट्विट करत व्यक्त केल्या. “माझ्या सद्भावना निर्भयाचे पालक, मित्र आणि नातेवाईकांबरोबर आहेत. या न्यायासाठी बराच वेळ वाट पहावी लागली पण अखेर न्याय मिळालाच.”

काय आहे प्रकरण 

डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीत चालत्या बसमध्ये निर्भयावर सामूहिक व क्रूर पध्दतीने बलात्कार करण्यात आला. या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. आज सकाळी साडेपाच वाजता या प्रकरणातील चारही दोषींना मुकेश सिंग (३२), पवन गुप्ता (२५), विनय शर्मा (२६) आणि अक्षय कुमार सिंग (३१)यांना फाशी देण्यात आली. 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive