By  
on  

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर शिवानी बावकर करतेय नवी सुरुवात, जाणून घ्या

शितली म्हणून घराघरांत पोहचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर. 'लागिरं झालं जी' मालिकेतून शिवानीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यानंतर आल्टी-पल्टी या विनोदी शैलीतील मालिकेतूनसुध्दा झळकली. युथफुल या सिनेमाद्वारे तिने सृष्टीतही पदार्पण केलं. आता शिवानी येत्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवी सुरुवात करतेय. ...नवी सुरुवात वाचून कोड्यात पडलात ना....

शिवानीची नवी सुरुवात म्हणजे....ती लवकरच झी टॉकीजवर निवेदकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.येत्या हिंदू नववर्षाची सुरुवात गुढी पाडव्यापासून होते. सर्वत्र उत्साहात हा सण साजरा केला जातो. याच मुहूर्तापासून मन मंदिरा- गजर भक्तीचा, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ती करताना पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील मंदिरांना आणि धार्मिक स्थळांना शिवानी भेट देऊन तेथे किर्तनाच्या रंगात सर्व प्रेक्षकांनासुध्दा दंग करुन टाकणार आहे. 

शिवानीच्या या नव्या भूमिकेवर रसिकप्रेक्षक भरभरुन प्रेम करतील यात शंका नाही. पिपींगमूनमराठीतर्फे अभिनेत्री शिवानी बावकरला या नव्या इनिंगसाठी खुप सा-या शुभेच्छा !

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive