कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये लॉकडाऊन घोषीत केले आहे. आणि म्हणूनच मागील आठवड्यापासून लोकं घरात बसून आहेत. मात्र घरात बसून आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा, त्यांना मदत करण्याचा पर्याच बहुतांश लोकांनी निवडलाय.
शुटिंगमध्ये सतत व्यस्त असणारा अभिनेता सुबोध भावे या निमित्ताने घरात आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतोय. एवढच नाही तर पत्नी मंजीरीलाही कामात मदत करतोय. सुबोध स्वत: तर तिला कामात मदत करत आहेच पण त्याच्यासोबत त्याची मुलं मल्हार आणि कान्हाही त्याला या कामात मदत करत आहेत. सुबोधची पत्नी मंजीरीने तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर नुकताच एक फोटो पोस्ट केला. यामध्ये सुबोधसह दोन्ही मुलं घरातील झाडलोट करण्यात मदत करत असतानाचं पाहायला मिळतय.
काही दिवसांपूर्वी मंजिरीने सुबोधसह दोन्ही मुलांचा आराम करत असल्याचा फोटो पोस्ट केला आणि त्यानंतर लगेचच ही मंडली कामाला लागली असल्याचं मंजिरी या पोस्टमध्ये गमतीशीर म्हणते. शिवाय "भावेज क्लिनिंग सर्विसेस असं म्हणत आम्ही मोलकरीण कामावर येईपर्यंत काम करणार" असही फोटोवर कॅप्शन दिलय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये मंजिरी लिहीते की, “या पुरुष मंडळींसोबत मी राहते, पर्वा पोस्ट केलेल्या फोटोचा परिणाम म्हणून आता घरातील साफसफाईची काळजी घेतली जात आहे. मी यांच्यावर खूप प्रेम करते.”
घरात बसून एकाच व्यक्तिवर कुटुंबाचा भार न येता सगळ्यांनी एकत्र मिळून काम करत एकमेकांची कशी काळजी घेतली पाहिजे त्याचं हा परिवार उत्तम उदाहरण आहे.