देशासमोर उभ्या असलेल्या करोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी सरकारी यंत्रणा युध्द पातळीवर काम करतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढचे तब्बल 21 दिवस देश लॉक डॉऊन करण्याचा ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरु राहणार आहे. आपणही एक सुजाण नागरिक म्हणून त्यांना यात संपूर्ण सहकार्य देणं अपेक्षित आहे.आपल्याला कुठलंच कठीण काम करायचं नाहीय, तर फक्त स्वत:च्याच घरात सुरक्षित राहून सरकारला सहकार्य करायचंय व यंत्रणांवरचा ताण कमी करायचा आहे.
याच पार्श्वभूमीवर सध्याचं दाहक वास्तव मांडणारा एक व्हिडीओ तुम्हाला नेहमी हास्याची मात्रा देणा-या कलाकारांनी वर्क फ्रॉम होमच्या संकल्पनेअंतर्गत तयार करुनच फेसबुकच्या माध्यमातून पोस्ट केला आहे. ‘आम्हाला काही फरक पडत नाही, जोवर आमचं कुणी जात नाही…’ असे काळजाचा ठाव घेणा-या कवितेतून सध्य परिस्थिती या कलाकारांनी मांडली आहे, व घराबाहेर न पडण्याची कळकळीची विंनंतीही त्यांनी व्हिडीओद्वारे केली आहे.
प्राजक्ता माळी, पंढरीनाथ कांबळे, नम्रता आवटे, समीर चौघुले, विशाखा सुभेदार आदी सर्वच कलाकारांनी या व्हिडीओद्वारे बोचरं वास्तव माडलं आहे. त्यामुळे आता तरी जागे व्हा...सुजाण नागरिकहो !
शब्दांकन- अक्षय जोशी
संकल्पना - प्रसाद खांडेकर
संगीत आणि संकलन - सुशील कांबळे
पाहा व्हिडीओ --