14 दिवसांचा क्वारंटाईन संपला तरी मिथिला पालकरला....

By  
on  

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोनाच्या विळख्यातून देशाला सोडवण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. ह्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर फक्त जीवनावश्यक सेवा व वस्तूंचा पुरवठा सोडल्या इतर सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. नागरिकांना सक्तीने घरी बसण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच जे परदेशातून परतले आहेत त्यांनी १४ दिवसांचा होम क्वारंटाईन पाळणं सक्तीचं आहे. 

वेब क्वीन अशी ओळख असेलेल्या आणि हिंदी मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी  अभिनेत्री मिथिला पालकरही ऑस्ट्रेलियाहून परतली व तिलाही १४ दिवस होम क्वारंटाईन राहणं अर्निवार्य होतं. त्यामुळे ती तिच्या लाडक्या आजी-आजोबांना भेटू शकली नाही. 

इतकंच नव्हे तर त्यांचा गोड पापा व हवीहवीशी मिठीसुध्दा तिला घेता आली नाही. आता तिचे १४ दिवस पूर्ण झाले आहेत, ती आजी-आजोबांजवळ आहे, पण तरीही खबरदारी म्हणून तिला या प्रेमाच्या गोष्टींना मुकावं लागत आहे. ही खंत मिथिलाने आजी-आजोबांसोबतचा लहानपणीचा फोटो पोस्ट करत व्यक्त केली आहे. सोशल डिस्टन्स ठेवण्याचं पालन मिथिला सारखं सर्वांनीच करायला हवं. घरीच राहूया, सुरक्षित राहूया. 

मिथिला आपले बोल्ड फोटो नेहेमीच शेअर करत असते. या मराठमोळ्या अभिनेत्रीची भुरळ बॉलिवूडलाही पडलीय. मिथिला आपल्या स्टाईल आणि फॅशन साठी ती खास ओळखली जाते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Styled by @shreejarajgopal Make up @sahithya.shetty @Hair @siddheshavinashshinde @rahuljhangiani

A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial) on

इरफान खान सोबत ‘कारवां’सिनेमातून मिथिलाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या सिनेमातील तिच्या विशेष भूमिकेचे देखील खूप कौतुक झाले होते. तर मराठीत ‘मुरांबा’तून तिने मराठी प्रेक्षकांची मनं जिंकली. 

 

Recommended

Loading...
Share