By  
on  

सई ताम्हणकर धावली करोनाग्रस्तांच्या मदतील, केली दिड लाखांची मदत

करोनाच्या थैमाने प्रत्येकजण अस्वस्थ झाला आहे. करोना ग्रस्तांच्या दिवसागणिक वाढणा-या संख्येने काळजीत भर पडत आहे. याशिवाय करोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी तसेच राज्याची विस्कटलेली घडी सुधारण्यासाठी शासनाला मोठ्या प्रमाणावर निधीची गरज आहे.
 अशा वेळी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री सहायता निधी-कोविड 19 या नावाने निधी उभं करण्याचं ठरवलं आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by PeepingMoon Marathi (@peepingmoonmarathi) on

 

यामध्ये अनेक कलाकार सढळ हस्ते मदत देत आहेत. अभिनेत्री सई ताम्हणकरनेही या निधीमध्ये मदतीची भर घातली आहे. सईने जवळपास दिड लाखाची मदत या निधीसाठी दिली आहे. ‘आपण मदत करुया, करोनाविरुद्ध लढा देऊ या’ . असं कॅप्शन देत सईने मदत केली आहे. याशिवाय सईने चाहत्यांनाही असा निधी जमा करण्यासाठी चाहत्यांना आवाहन केलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive