राज्यात दररोज करोनाग्रस्तांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना पाहायला मिळते. सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन संपूर्ण देशा्त जाहीर केला आहे. सर्व दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरळीत सुरु राहणार आहे. त्यामुळे आहे, तिथे म्हणजेच आपापल्या घरीच राहून सुरक्षित राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे. या संदर्भात अभिनेते व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ, अमोल कोल्हे यांनी नागरिकांच्या डोळ्यात तेल घालणारा एक व्हिडीओ नुकताच फेसबुकवरुन शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये करोनाचा गुणाकार समजावताना एक महत्त्वाचं उदाहरण समजावून सांगितलं आहे. लॉकडाउनदरम्यान एक व्यक्ती नियम मोडून मुंबईहून जुन्नरला आली. त्यानंत १७ मार्च रोजी ही व्यक्ती अनेकांना भेटली. त्यातच २७-२८ मार्चदरम्यान या व्यक्तीला करोना झाल्याचं आढळून आलं, असं उदाहरण त्यांनी यावेळी दिलं आहे. त्यामुळे या व्यक्तीच्या संपर्कातील लोकांना करोनाची लागण झाल्याची चाचणी करावी लागणार आहे.
करोनाला गांभिर्याने घेण्याची वेळ आहे, असं अमोल कोल्हे कळकळीने सांगताना पाहायला मिळाले.