By  
on  

अमृता सुभाष म्हणतेय, ‘ अरे संसार संसार’ .......

लॉकडाऊनमुळे सामान्य लोक असोत किंवा सेलिब्रिटी घरात आहेत. एरवी लाईम लाईटमध्येच समोर आलेले हे सेलिब्रिटी आता मात्र तुमच्या आमच्या प्रमाणेच घरातील कामं करताना दिसत आहे. गुणी अभिनेत्री अमृता सुभाषही याला अपवाद नाही. शुटिंग बंद असल्याने अमृताही सध्या स्वयंपाक घरात रमली आहे. यामध्ये पती संदेशही तिला मदत करताना दिसत आहे. अमृताने भाकरी करतानाचा एक व्हिडियो शेअर केला आहे. 

 

 

एका सिनेमात धनगर स्त्रीची भूमिका अमृताला साकारायची असल्याने तिला भाकरी शिकावी लागली होती. त्याचाच उपयोग आता तिला होत आहे. यानंतरच्या व्हिडियोमध्ये अमृताचा पती संदेशही चपाती करताना दिसत आहे. यामध्ये संदेश त्याच्या आईकडून चपाती शिकला असल्याचंही सांगतो. भाकरीच्या या कलेबाबत अमृताने तिच्या सायलीताई आणि सरिताताईंविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive