By  
on  

 पाहा Video : उर्मिला कोठारेचे मुलीसोबत मिनी व्लॉग, ‘जीजा आणि आई’ व्लॉगचं नाव

सध्या लॉक़डाउनच्या काळात घरात बसून वेळ घालवण्यासाठी लोकं विविध गोष्टी करत आहेत. कलाकार मंडळीही घरात बसून त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. शिवाय सोशल मिडीयाच्या माध्यमातून जागरुक करत आहेत.

अभिनेत्री कोठारेदेखील घरात बसून परिवारासोबत वेळ घालवतेय. खासकरुन मुलगी जीजासोबत उर्मिला हा वेळ घालवतेय. याचनिमित्ताने उर्मिला मुलगी जीजासोबत व्हिडीओ करतेय. उर्मिलाने नुकताच मिनी व्लॉग सुरु केला आहे. यात उर्मिला मुलगी जीजासोबत काही व्हिडीओ करत आहे. ‘जीजा आणि आई’ असं या व्लॉगचं नाव ठेवण्यात आलय.  यानिमित्ताने गोंडस जीजाचे मजेशीर व्हिडीओही पाहायला मिळत आहेत. शिवाय या व्हिडीओतून काही महत्त्वाची माहितीही देण्याचा उर्मिला प्रयत्न करत आहे. सोशल मिडीयावर जीजाचे आई उर्मिला आणि वडिल आदिनाथ यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ हे चर्चेत असतात. शिवाय आजोबा महेश कोठारे यांच्यासोबतचे जीजाचे फोटोही चर्चेत असतात. 

सध्या घरात बसून कलाकार मंडळी अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडीओच्या माध्यमातून मनोरंजन तर करत आहेच पण त्यातून घरात बसण्याचं आवाहनही करण्यात येत आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive