By  
on  

Lockdown : ‘लागीरं झालं जी’ फेम निखिल चव्हाण करतोय गरजूंना मदत

सध्या देशभरात २१ दिवसांचा लॉकडाून जाहीर करण्यात आला आहे व देसातली व महाराष्ट्रातील परिस्थिती बघता तो आणखी वाढवण्याची दाट शक्यता आहे. आज सर्वच दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. ज्यांना शक्य आहे ते लोक घरुन काम करत आहेत. पण ज्यांचं हातावर पोट आहे, त्यांचं काय, दोन घास पोटात जाणंही त्यांच्यासाठी आता या घडीला मुश्कील होऊन बसलं आहे. 

या  दरम्यान अनेक सेलिब्रिटी आणि उद्योगपती, सेवाभावी संस्था या गरजवंताच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत.अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा, अन्नधान्य अशा स्वरुपाची मदत प्रत्येकजण आपापल्यापरीने करतोय. अशातच ‘लागीरं झालं जी’ फेम अभिनेता निखिल चव्हाणनेही ह्या गरजवंताना मदतीचा हात दिला आहे. जसा मालिकेत तो सैन्यदलात असल्याने देशाच्या संरक्षणासाठी शहिद होतो, तसाच ख-या आयुष्यातही देशवासियांसाठी त्याने खारीचा वाटा उचलला आहे. 

अभिनेता निखिल चव्हाण आणि शेवाळेवाडीचे उपसरपंच अमित (अण्णा) पवार संचालित ‘राजे क्लब’च्या माध्यमातून आजपर्यत जवळपास १७० कुटुंबाना या क्लबच्या माध्यमातून अन्नधान्याचा पुरवठा करण्यात आला आहे. यापुढेही ते आणखी जास्त गरजवंतापर्यंत पोहचणार आहेत. गरजूंसाठी ही ओंजळभर मदत नक्कीच मोलाची ठरतेय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive