By  
on  

या कलाकारांनी तमाशा कलावंतांना दिला मदतीचा हात

कोरोना व्हायरसचा सुळसुळात सध्या देशातच नाही तर जगभरात आहे. त्यातच देशात लॉकडाउन सुरु आहे. लॉकडाउनमध्ये सर्व काही बंद असताना विविध कार्यक्रमही बंद आहेत. या बंदचा फटका विविध क्षेत्राला बसतोय. त्यातच तमाशा कलावंतांनाही याचा फटका बसला आहे. याचं नुकसान त्यांना सहन करावं लागतय. 


या तमाशा कलावंतांसाठी आता काही कलाकार धावून आलेत. 'मुळशी पॅटर्न' सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक-लेखर प्रविण तरडे यांनी हा मदतीचा हात पुढे केला आहे. या दोघांनी मिळून या तमाशा कलावंतांना आर्थिक मदत केली आहे. विविध गावांमध्ये भरत असलेल्या यांत्रांना हे तमाशा कलावंत परफॉर्म करतात. मात्र लॉकडाउनमुळे या यात्राही रद्द आणि तमाशा परफॉर्मन्सही बंद आहेत. मात्र या कार्यक्रमांच्या सुपाऱ्या बंद असल्याने या कलावंतांना जवळपास नऊ कोटींचा फटका बसलाय. आणि म्हणूनच या कलाकारांना आर्थिक समस्यांना तोंड  द्यावं लागतय. मात्र प्रविण तरडे आणि पुनित बालन यांनी त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive