By  
on  

व्यक्तिमत्त्वाला आकार देणाऱ्या या challenge बद्दल मला खूप कृतज्ञ वाटतं -स्पृहा जोशी

प्रत्येकाला कधीना कधी कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा न्यूनगंड हा असतोच. पण त्यावर यशस्वी मात करायला ज्याचं त्यानंच शिकलं पाहिजे व पारंगत होऊन त्यावर मात करायला हवी. तुम्हाला माहितच आहे, अभिनेत्री स्पृहा जोषी क्वारंटाईनचे हे २१ दिवस दररोज तिला वाटणा-या गोष्टी, आठवणींबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. आज तिने तिला वाटणा-याा आव्हानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

स्पृहा म्हणते, " मराठी माध्यमात पहिली ते दहावी शिकल्यामुळे मराठी भाषेवर पकड पहिल्यापासून उत्तम होती. पण घरातलं वातावरण आणि रुईयाकॉलेज मध्ये सुद्धा तसं मराठमोळं वातावरण. त्यामुळे इंग्रज़ी, हिंदी बोलण्याचा सराव तसा फारसा नव्हता. त्यातल्या त्यात वरदच्या संगतीने english पुस्तकं वाचायची सवय लागली. आणि UPSC चा अभ्यास म्हणून रोज २ इंग्लिश वृत्तपत्र वाचायची सुद्धा. पण तरीसुद्धा फाडफाड english मध्ये, hindi मध्ये बोलणाऱ्या लोकांमध्ये थोडंसं दबल्यासारखं व्हायचं. पण हळूहळू ठरवलं की हे दडपण आड येऊ द्यायचं नाही. स्वतःवर काम करायचं. hindi, english बोलताना ठामपणे, आत्मविश्वासाने बोलायचं. आपल्या बोलण्यात शक्यतो accent येणार नाही याची काळजी घ्यायची. हे challenge माझ्या करियरला, मला वेगळी दिशा देऊन गेलं. मला हे १००% जमलंय असा माझा दावा अजिबात नाही. पण त्या दिशेने प्रयत्न नीट चाललेत हे नक्की. माझ्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणाऱ्या या challenge बद्दल मला खूप कृतज्ञ वाटतं."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

. #20 What challenge are you grateful for? मराठी माध्यमात पहिली ते दहावी शिकल्यामुळे मराठी भाषेवर पकड पहिल्यापासून उत्तम होती. पण घरातलं वातावरण आणि रुईयाकॉलेज मध्ये सुद्धा तसं मराठमोळं वातावरण. त्यामुळे इंग्रज़ी, हिंदी बोलण्याचा सराव तसा फारसा नव्हता. त्यातल्या त्यात वरदच्या संगतीने english पुस्तकं वाचायची सवय लागली. आणि UPSC चा अभ्यास म्हणून रोज २ इंग्लिश वृत्तपत्र वाचायची सुद्धा. पण तरीसुद्धा फाडफाड english मध्ये, hindi मध्ये बोलणाऱ्या लोकांमध्ये थोडंसं दबल्यासारखं व्हायचं. पण हळूहळू ठरवलं की हे दडपण आड येऊ द्यायचं नाही. स्वतःवर काम करायचं. hindi, english बोलताना ठामपणे, आत्मविश्वासाने बोलायचं. आपल्या बोलण्यात शक्यतो accent येणार नाही याची काळजी घ्यायची. हे challenge माझ्या करियरला, मला वेगळी दिशा देऊन गेलं. मला हे १००% जमलंय असा माझा दावा अजिबात नाही. पण त्या दिशेने प्रयत्न नीट चाललेत हे नक्की. माझ्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणाऱ्या या challenge बद्दल मला खूप कृतज्ञ वाटतं. - स्पृहा ️

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad) on

स्पृहाने भाषेवरची ही पकड शिकता शिकताच मजबूत केली आणि त्यामुळेच ती आता हिंदी सिनेसृष्टीतही आपली ओळख निर्माण करु पाहतेय,

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive