By  
on  

हा प्रवास तुम्हा सगळ्यांच्या साथीने खूप मस्त झाला. : स्पृहा जोशी

देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधानांनी जाहीर केल्यानंतर स्पृहाने कृतज्ञता डायरी लिहण्याचा सुंदर उपक्रम सुरु केला. चाहत्यांनाही तो खुपच भावला. कमेंट्स, लाईक्समधून त्यांनी तो दर्शवलासुध्दा. स्पृहा तिच्या आयुष्यात तिला कृतज्ञ वाटणा-या गोष्टी, आठवणी, माणसं लिहते. आज १४ एप्रिल तिच्या कृतज्ञता डायरीचा अखरेचा दिवस. पण तिने तिच्या पोस्टमधून चाहत्यांनां एक अनपेक्षित सरप्राईज दिलं आहे.

स्पृहा म्हणते, "मित्रांनो, gratitude diary ची आज शेवटची पोस्ट. २१ वी. २१ दिवसाच्या या लॉकडाऊनच्या काळात हा एक छोटासा प्रयत्न होता.. काही छोट्या छोट्या गोष्टींना acknowledge करण्याचा.. मनाला उभारी देण्याचा.. वाईटातून चांगलं शोधण्याचा.. हा प्रवास तुम्हा सगळ्यांच्या साथीने खूप मस्त झाला. किती जणांनी त्यांच्या त्यांच्या आठवणी, किस्से शेअर केले.. हा संवाद एकांगी ना राहता दोन्ही बाजूंचा झाला, कारण तुम्ही सगळे त्यात सहभागी झालात. कित्येकांनी मेसेजेस पाठवून ही कल्पना आवडल्याचं सांगितलं.. किती तरी जणांना यातून अशाच काही नव्या कल्पना सुचल्या. किती तरी जण यातून त्यांची स्वतःची gratitude diary लिहायला लागलेत. हे किती मस्त आहे.. फक्त फोटोपुरत्या लाईक्स आणि कॉमेंट्सच्या पलीकडे जाऊन आपण एकमेकांना भेटलो याचा आनंद मोठा आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Gratitude Diary #Quarantine #Day21 #21 What small thing that happened today are you grateful for? मित्रांनो, gratitude diary ची आज शेवटची पोस्ट. २१ वी. २१ दिवसाच्या या लॉकडाऊनच्या काळात हा एक छोटासा प्रयत्न होता.. काही छोट्या छोट्या गोष्टींना acknowledge करण्याचा.. मनाला उभारी देण्याचा.. वाईटातून चांगलं शोधण्याचा.. हा प्रवास तुम्हा सगळ्यांच्या साथीने खूप मस्त झाला. किती जणांनी त्यांच्या त्यांच्या आठवणी, किस्से शेअर केले.. हा संवाद एकांगी ना राहता दोन्ही बाजूंचा झाला, कारण तुम्ही सगळे त्यात सहभागी झालात. कित्येकांनी मेसेजेस पाठवून ही कल्पना आवडल्याचं सांगितलं.. किती तरी जणांना यातून अशाच काही नव्या कल्पना सुचल्या. किती तरी जण यातून त्यांची स्वतःची gratitude diary लिहायला लागलेत. हे किती मस्त आहे.. फक्त फोटोपुरत्या लाईक्स आणि कॉमेंट्सच्या पलीकडे जाऊन आपण एकमेकांना भेटलो याचा आनंद मोठा आहे.. ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढला आहे. आपलं मनोबल खच्ची होऊ न देणं गरजेचं आहेच. त्यामुळे भेटत राहूया.. एकमेकांशी बोलत राहूया.. आज आलेल्या मेसेजेसमध्ये एका मित्राने सांगितलं की या डायरीमुळे तो inspire झाला.. inspiration.. प्रेरणा!!! आपण आपलं बेसिक जगणं जगता जगता कोणासाठी तरी प्रेरणा बनू शकतो हे जाणवणं.. ही माझ्या छोट्याशा जगातली खूप मोठी घडामोड आहे. त्यामुळे या गोष्टीसाठी मी कृतज्ञ आहे.. - स्पृहा ️

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad) on

 ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन  वाढला आहे. आपलं मनोबल खच्ची होऊ न देणं गरजेचं आहेच. त्यामुळे भेटत राहूया.. एकमेकांशी बोलत राहूया..
आज आलेल्या मेसेजेसमध्ये एका मित्राने सांगितलं की या डायरीमुळे तो inspire झाला.. inspiration.. प्रेरणा!!! आपण आपलं बेसिक जगणं जगता जगता कोणासाठी तरी प्रेरणा बनू शकतो हे जाणवणं.. ही माझ्या छोट्याशा जगातली खूप मोठी घडामोड आहे. त्यामुळे या गोष्टीसाठी मी कृतज्ञ आहे.."

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive