By  
on  

ही प्रसिद्ध जोडी पुन्हा झळकणार एकत्र, हे आहे निमित्त

मराठी टेलिव्हिजनवरील ऑनस्क्रिन अशा कित्येक प्रसिद्ध जोड्या आहेत ज्यांना पुन्हा पाहण्याची  प्रेक्षकांची उत्सुकता आहे. यापैकी एक जोडी म्हणजे 'काहे दिया परदेस' या मालिकेतील शिव गौरीची जोडी प्रसिद्ध झाली होती. 

शिव आणि गौरी म्हणजेच अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता रिशी सक्सेना ही जोडी प्रसिद्ध झाली होती. आणि हीच जोडी  आता पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहे. हे निमित्त आहे आगामी एका गाण्याचं. 'लाजीरा' या आगामी गाण्यात सायली आणि रिशी एकत्र झळकणार आहे. नुकताच दोघांनी सोशल मिडीयावर या गाण्याचा पोस्टर प्रदर्शित केला आहे. हा पोस्टर पाहुन त्यांच्या चाहत्यांना शिव आणि गौरीची आठवण येत आहे. या पोस्टमध्ये सायली म्हणते की,  "तिच्या मनानं त्याच्या दिलावर , जणू इश्कच केलाय! त्यांच्या प्रेमाने त्यांचा जीव कसा बघ, लाजीरा झालाय" -अनुभव. एक कथा पुन्हा नाही घडू शकत पण जोडी? हां ती नक्कीच पुन्हा भेटू शकते...शिव गौरीची एक गोष्ट होती! आता एक गाणं चालेल? होऊ दे थोडा जीव लाजीरा?? "

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

"तिच्या मनानं त्याच्या दिलावर जणू इश्कच केलाय! त्यांच्या प्रेमाने त्यांचा जीव कसा बघ, लाजीरा झालाय" -अनुभव एक कथा पुन्हा नाही घडू शकत पण जोडी? हां ती नक्कीच पुन्हा भेटू शकते...शिव गौरीची एक गोष्ट होती! आता एक गाणं चालेल? होऊ दे थोडा जीव लाजीरा?? So...Let the love fly...Let the story begin but to start that we should switch it on first! *Let's switch on the red bulb music; Feel the love!* • • • #lajira #comingsoon #rishisaxena #sayalisanjeev #staytuned #stayhome #staysafe

A post shared by सायली संजीव (@sayali_sanjeev_official) on

 

असं म्हणत सायलीनेही शिव-गौरीची आठवण करुन दिलीय. मात्र हीच जोडी पुन्हा पाहायला मिळणार असल्याचं सायली म्हणतेय.  लवकरच हे गाणं प्रदर्शित होणार असून सायली आणि रिशीच्या चाहत्यांना त्याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive