देशभरात करोनाचा धुमाकूळ सुरुच आहे म्हणून खबरदारीचं पाऊल म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. पण मोदींजींनी सकाळी हा निर्णय घेतला आणि दुपारी चारच्या सुमारास जवळपास हजारोंच्या संख्येने परप्रांतियांनी वांद्रे स्थानकात आपल्या गावी परतण्यासाठी गर्दी केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले होते. त्यामुळे खुप तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मुख्यमंत्र्यांनीसुध्दा याची दखल घेत ताबडतोब जनतेशी संवाद साधत महाराष्ट्रात तुमची काळजी घेतली जाईल, असा परप्रांतिय नागरिकांना आश्वासक दिलासा दिला.
या घटनेनंतर संतापलेले दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनीदेखील त्यांची भूमिका मांडत लोकांना आवाहन केलं.‘देशाचा सगळ्यात मोठा शत्रु कोरोना नाही तर अफवा पसरवणारी भूतं आहेत .. त्यांच्या पासून लांब राहा’,असं ट्विट प्रवीण तरडे यांनी करत अफवांवर विश्वास ठेवू नका असं सांगितलं आहे.
देशाचा सगळ्यात मोठा शत्रु कोरोना नाही तर अफवा पसरवणारी भूतं आहेत .. त्यांच्या पासून लांब राहा ..
— Pravin Vitthal Tarde (@WriterPravin) April 14, 2020
१४ एप्रिल रोजी लॉकडाउन संपून आपल्या गावी परत जाता येईल, या आशेवर गेल्या महिन्याभरापासून शहरात अडकलेल्या हजारो मजुरांचा अपेक्षाभंग झाला.त्यांना आता त्यांच्या राज्यात कधी एकदा परततो, याची ओढ लागली आहे. प्रवीण तरडेंनी संताप व्यक्त करत अशा कुठल्याच अफवांवर कोणीच विश्वास ठेऊ नये असं आवाहन केलं आहे.