आज संपूर्ण जगाला करोना विषाणूने सळो की पळो करुन सोडलंय. या रोगामुळे जगभरात मरण पावलेल्यांची संख्या काही हजारांच्या घरात आहे. आपल्या देशातही करोनाचे रुग्ण आता झपाट्याने वाढू लागले आहेत. मुंबईत तर ही संख्या लक्षणीय वाढतेय. देशभर ३ मेपर्यंत लॉकडाऊन काळ वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे. प्रत्येकाला घरीच राहून सुरक्षित राहायचं आहे व यंत्रणांवरचा ताण हलका करायचा आहे.
करोनाविषयक जनजागृती कण्यासाठी अनेक कलाकारांनी पुढाकार घेतला आहे. प्रत्येकजण व्हिडीओ आपापल्या घरातून पाठवत आहेत, व त्यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर पाहायला मिळतोय. वर्कफ्रॉम होम अंतर्गतच ही जनजागृती केली जात आहे, तर कुठे पोलिस, डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी व सफाई कामगारांच्या कार्याला सलाम दिला जातोय. आणखी एक कलाकारांचा नवा व्हिडीओ रसिकांच्या भेटीला आला आहे.
"लढवय्या मी महाराष्ट्राचा... ", हे स्फूर्तिदायक आणि करोना संकटासी लढा देताना कसं धैर्याने वागायला हवं अशी शिकवण देणारं हे गाणं आहे. या गाण्यात सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, डाॅ. अमोल कोल्हे, सचिन खेडेकर, जयवंत वाडकर, विजय पाटकर,अशोक समर्थ, सुशांत शेलार, अनिकेत विश्वासराव, मृणाल कुलकर्णी, तेजश्री प्रधान, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी,प्राजक्ता कोळी, मृणाल ठाकुर,अंजली भागवत, विठ्ठल कामत, कौशिक मराठे, रामदास करवंदे, इंद्रनील चितळे हे सिनेसृष्टीतील मान्यवर कलावंत पाहायला मिळतायत.
तर या गाण्यासाठी सई गांगण व चिन्मय हुल्याळकर यांनी पार्श्वगायन केलं आहे. या गाण्याचं संकलन नीरज पाटील यांनी केलं असून दिग्दर्शनाची धुरा संतोष मांजरेकर, संकेत सावंत यांनी सांभाळली आहे.
पाहा गाणं -
संगीत संयोजक - हृषिकेश गांगण
संगीतकार - रसिक मेटांगळे गीतकार -
वलय मुळगुंद दिग्दर्शक -