By  
on  

Corona virus: तू परत ये गाण्यातून कलाकारांची बाप्पाला भावनिक साद

करोनाच्या प्रभावामुळे आपण सगळेजण लॉकडाऊन आहोत. प्रत्येकजण त्याच्या घरात कैद आहेत. महाराष्ट्रात आणि मुंबईत दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय भर पडतेय. परिस्थिती गंभीर होत चालली आहे. हे गांभिर्य जाणून घेत प्रत्येकाने आहे तिथेच घरात थांबून सुरक्षित रहावं व करोनाचा प्रादुर्भाव रोखावा.

 

 

यावेळी जनतेचं मनोबल वाढवण्यासाठी कलाकारही प्रयत्नशील आहेत. कलाकारांनी नुकतीच ‘तू परत ये’ या गाण्यातून बाप्पाला हे विघ्न दूर करण्याची विनंती केली आहे. अभिनेता समीर धर्माधिकारीसह अनेक कलाकार या गाण्यात दिसत आहेत. जगावर ओढावलेलं संकट दूर होऊन पुन्हा सारं सुरळीत व्हावं यासाठी विनवणी करत आहे. 
या गाण्याचं दिग्दर्शन स्वरुप बाळासाहेब सावंत यांनी केलं आहे. सागर फडके यांनी हे गाणं गायलं आहे. या गाण्यामध्ये समीर धर्माधिकारी, प्रथमेश परब, प्रणव रावराणे, निखिल वैरागर, अक्षय टंकसाळे, सिध्देश्वर झाडबुके, विजय आंदळकर, निखिल राऊत,  जयेश चव्हाण आणि स्वरूप बाळासाहेब सावंत हे कलाकार दिसत आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive