सध्या करोना संकटामुळे सर्व काही ठप्प झालं आहे. जीवनावश्यक वस्तू व सेवा वगळता सर्वकाही बंद असून आता तर लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची घोषणा सरकारने केली. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वच जण घरी असून करोनाला हरवण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. तेव्हा घरी बसून छंद व इतर घर कामं करुन कंटाळल्यावर टिकटॉकव व्हिडीओ करत धम्माल उडवून देण्याचं सर्वांनाच या काळात वेड लागलं आहे. मग सेलिब्रिटी तरी याला कसे अपवाद असतील.
तुम्हाला माहितच आहे, रितेश व जेनेलिया या क्युट जोडीचे टिकटॉक व्हिडीओ किती व्हायरल होतात व चाहत्यांची कशी त्यांना दाद मिळते. आता पुन्हा एकदा रितेशचा एक जबरदस्त टिक-टॉक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे यात रितेशचे दोन लुक्स पाहायला मिळतायत. मॅजिक मिरर पुसता पुसता तो अचानक खलनायक दिसू लागतो अशी या व्हिडीओची गंमत आहे.
खरंतर, लॉकडाऊनमुळे रितेशने संपूर्ण टक्कल केलं असावं, व त्यानंतर ह्या व्हिडीओचं शूट केलं. यातील बॅकग्राऊण्डचं मै हू खलनायक....हे गाणं लय भारी वाटतंय.
नेहमीप्रमाणेच रितेशच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.