आज करोना संकटामुळे सर्वच दैनंदिन कामं ठप्प आहेत फक्त जीवनावश्यक वस्तूं व सेवांचा पुरवठा तेवढा सुरळीत सुरु आहे. पार्लर्स, सलोन हेसुध्दा बंद असल्याने आता अनेकांनी घराचच सलोन करत व शस्त्र हाती घेत स्वत:चा किंवा आपल्या कुटुंबियांचा मेकओव्हर करण्याचं ठरवलंय. दरम्यान आपले लाडके सेलिब्रिटीसुध्दा हा वेळ स्वत:च्या कुटुंबियांसोबत घालवत आहे. सामान्यांप्रमाणेच तेसुध्दा याला अपवाद नाहीत. त्यांनीसुध्दा हातात कैची घेऊन कलाकुसर करायला सुरुवात केली आहे.
अभिनेता संदीप पाठकने कैची तर हातात घेतलीच पण त्यासोबतच त्याने चाहत्यांना एक प्रश्नसुध्दा विचारलाय. संदीप म्हणतो, केस STUDY कलाकाराला वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात. त्या भूमिका केवळ रंगमंचावर, सिनेमातच नाही तर घरी पण उत्तम वठवाव्या लागतात.निषाद ची कटिंग करताना मला 'येड्यांची जत्रा' सिनेमातली माझी भूमिका आठवली.त्या भूमिकेचं नाव????? तुम्हाला आठवतंय? #म #मराठी
केस STUDY कलाकाराला वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात. त्या भूमिका केवळ रंगमंचावर, सिनेमातच नाही तर घरी पण उत्तम वठवाव्या लागतात.निषाद ची कटिंग करताना मला 'येड्यांची जत्रा' सिनेमातली माझी भूमिका आठवली.त्या भूमिकेचं नाव????? तुम्हाला आठवतंय? #म #मराठी pic.twitter.com/5LRMQigRgf
— संदीप पाठक (@mesandeeppathak) May 21, 2020
जर तुम्हाला याचं उत्तर माहित असेल तर संदीपला लवकरात लवकर कळवा.