By  
on  

ऑन ड्युटी २४ तास अहोरात्र सुरक्षेसाठी झटणा-या पोलिसांच्या जीवनावर आधारित 'कवच' लवकरच

'सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय' या ब्रीद वाक्याशी प्रामाणिकपणे जागत महाराष्ट्राचे पोलीस कायमच समाजाच्या सुव्यवस्थेसाठी झटत असतात. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता ऑन ड्युटी २४ तास अहोरात्र सुरक्षेसाठी झटणारे पोलिस आज देशावर ओढवलेल्या सामाजिक आपत्तीतही सर्वांच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरले आहेत. पण पोलिसांचे कार्य कधीही सामान्यांच्या नजरेत येत नाही. त्यांचे हे कार्य एखाद्या 'कवच-कुंडला'सारखचं असतं. पोलिसांच हे कवच आपल्याभोवती असल्याने आपण आज सुरक्षित आहोत. याची जाणीव करुन देणारा 'मातृपितृ फिल्म्स' कंपनी निर्मित कवच हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक घनशाम विष्णूपंत येडे या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन करणार आहेत. नुकतीच त्यांनी या संबंधीची घोषणा केली आहे.

रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीराला सुरक्षाकवच प्रदान करण्याचं कार्य करते. त्याचप्रमाणे समाजाच्या स्वास्थ्यासाठी पोलिसांचे 'सुरक्षा कवच' गरजेचे आहे. हे 'सुरक्षा कवच' आपल्याभोवती नसेल तर सामाजिक अस्वस्थतता निर्माण होऊ शकते. हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न  कवच.. पोलिसांचे  समाजाला नसते तर या चित्रपटातून करण्यात येणार आहे.

सामाजिक बांधिलकी जपत दिग्दर्शक घनशाम विष्णूपंत येडे यांनी आजवर 'बोला अलख निरंजन' हा नवनाथांवरचा चित्रपट घराघरात पोहोचवला तसेच सीमेवर लढणाऱ्या फौजी बांधवांच्या मनोबलासाठी 'चल रे फौजी' या चित्रपटाची निर्मिती पूर्ण केली आहे. 

करोनाच्या विरोधात सुरु असलेल्या लढाईतही पोलिसांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कार्याला सलाम करत कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने गायक आदर्श शिंदे यांच्या आवाजातील कवच चित्रपटातील शीषर्क गीत लवकरच 'मातृपितृ फिल्म्स'च्या युटयूब चॅनलवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे संगीत सूरज यांचे असून चित्रपटाचे छायांकन सरफराज खान करणार आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive