By  
on  

नेहा पेंडसेने शेयर केली 'जून' सिनेमाची ही झलक, सिनेमात नेहासोबत आहे सिध्दार्थ मेनन

मागील वर्षी ‘जून’ या सिनेमाचा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करून या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. याच वर्षी हा सिनेमा प्रदर्शित होणार होता.
नुकतीच या सिनेमाची झलक प्रदर्शित करण्यात आली आहे. या सिनेमातील मुख्य कलाकार नेहा पेंडसे आणि सिध्दार्थ मेनन यांनी या सिनेमाची झलक पोस्ट केली आहे. या व्हिडीओच्या शेवटी हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार याविषयी लिहीलं आहे.

 

यात “यावर्षी किंवा पुढच्या वर्षी, जून हा दोन वेळा येईल” असं  लिहीलं आहे. तेव्हा हा सिनेमा कधी येणार याची उत्सुकता आहे. लॉकडाउनमुळे सिनेमांचं प्रदर्शनही थांबले आहेत. त्यामुळे हा सिनेमा केव्हा प्रदर्शित होईल हे लवकरच समोर येईल.
सुहरुद गोडबोले आणि वैभव खिस्ती यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive