By  
on  

रोहित पवारांनी सोनू सूदची भेट घेत केलं त्याच्या कार्याचं कौतुक

बॉलिवूड स्टार सोनू सूद हा स्थलांतरित मजूरांचा देवदूत बनला आहे, त्याच्या कार्याची माहिती तुम्हाला वेगळी सांगायची गरज नाही. सर्वत्रच त्याचं कौतुक होत आहे. देशभर त्याच्या कार्याचीच चर्चा सुरु आहे.  अनेक दिवसांपासून या मजूरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी हा देवदूत धडपडतोय. 

सोनूची भेट घेत नुकतंच  राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनीही त्याचं भरभरुन कौतुक केलं. या भेटीचं ट्विट करत रोहित पवार यांनी फोटोसुध्दा शेअर केले आहे. ते म्हणतात, " 'घर जाना हैं', हे स्थलांतरित मजुरांचे केवळ तीन शब्द ऐकून हजारो मजुरांना स्वगृही सुखरुप पोचवणाऱ्या @SonuSood  यांची आज त्यांच्या घरी भेट घेतली."

 

सर्वत्र सोनू सूद हे नाव ट्रेंड होत आहे. त्याचं कौतुक करण्यापासून सेलिब्रिटी आणि राजकारणीही स्वत:ला रोखत नाहीयेत. नुकतंच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीसुध्दा सोनूची भेट घेतली . 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive