By  
on  

ललित प्रभाकरने शेअर केला ‘मिडियम स्पाईसी’ च्या शुटिंग दरम्यानचा हा फोटो

हॅण्डसम अभिनेता ललित प्रभाकर ‘मिडियम स्पाइसी’ या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमात  सई ताम्हणकर, ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे या त्रिकुटाचं मेतकुट जमलं आहे. सागर देशमुख देखील या सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत आहे.  रंगभूमीवरील प्रसिद्ध नाव मोहित टाकळकर या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. 

 

 

या सिनेमाच्या निमित्ताने सई ताम्हणकर, ललित प्रभाकर आणि पर्ण पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. विधी कासलीवाल या सिनेमाच्या निर्मात्या आहे. ‘मिडियम स्पाईसी’ हा नात्यांवर भाष्य करणारा आधुनिक काळातील सिनेमा आहे.  पुण्यात या सिनेमाचं बरंचसं शुटिंग झालं आहे. या सिनेमाच्या आठवणींना उजाळा देणारा एक फोटो ललितने नुकतंच शेअर केला आहे. ‘हम देखेंगे, लाज़िम है कि हम भी देखेंगे वो दिन कि जिस का वादा है ... असा शेर पोस्ट करत त्याने हा फोटो शेअर केला आहे. सिनेमाचा विषय हटके असल्याने प्रेक्षकांना या सिनेमाची उत्सुकता आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive